Icc Test Team Ranking: भारतीय क्रिकेट संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-१ ने निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कसोटी क्रमवारीत संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
हायलाइट्स:
- भारताचे कसोटी क्रमवारीत मोठे नुकसान
- भारत क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला
- दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान काबीज केले
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. एकीकडे ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३-१ असा पराभव आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध २-० असा विजय यामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर येण्यात यशस्वी ठरली. इंग्लंड सध्या १०६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. क्रमवारीतील गुणांच्या बाबतीत न्यूझीलंड आणि इतर संघ अव्वल-५ पासून खूप दूर आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी कसोटी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.
भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत नाही
२०२१ मध्ये पहिल्यांदा जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला, तेव्हा भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. भारताने तेव्हा न्यूझीलंडसोबत ८ विकेट्सने पराभव पत्कारला आणि न्यूझीलंड संघाने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने दोन वर्षांनंतर २०२३ च्या फायनलमध्येही प्रवेश केला होता, पण यावेळी ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता ही पहिलीच वेळ आहे की भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार नाही. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी न्यूझीलंडशी मालिका खेळली होती. ही मालिका भारतात असूनही भारताला एकही सामना जिंकता आला नाही.