अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे कौतुक केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीत योगदान देण्याचे आवाहन केले. लाडकी बहिण योजना चालू ठेवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेचा फायदा झाल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रत्येक गावात पक्षाचा बोर्ड आणि झेंडा लागेल
पक्ष संघटन वाढवण्यासाठी अनेक घटकांना पक्षात आणावं लागेल. येणार काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. राज्यातील प्रत्येक गावात पक्षाचा बोर्ड आणि झेंडा लागेल यासाठी काम करायला हवं. प्रत्येक गावात स्वागताचे बोर्ड लागायला हवे. पक्ष वाढवण्याबरोबर पुरोगामी विचार सर्व ठिकाणी पोहचवला पाहिजे. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकता आणि बंधुभाव. सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायच.
‘धनंजय मुंडे….आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा’; अंजली दमानियांच्या ट्विटने खळबळ, काय कारण?लाडकी बहिण योजनेचा खूप परिणाम
समाज जीवनात आपल्याला बदल घडवायचाय. आजवर कुणाला मिळाले नव्हते एवढं बहुमत आपल्याला मिळालयं. मात्र, आता जबाबदारी आपली आहे. लोकसभेच्या निकालानंतर सर्व नामेद झाले होते. लाडकी बहिण योजनेचा खुप परिणाम सत्तेवर येण्यासाठी झाला. वेळ कमी होता. वैयक्तिक लाभ मिळालं कि लोक लक्षात ठेवतात. त्याचा परीणाम झाला. योजना चालू राहणार की, नाही हे विचारले जातंय. काही गोष्टी निवडणूक जाहीरनाम्यासाठी असतात.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत मोठे विधान
लाडकी बहिण योजना ही चालूच ठेवणार, असल्याचे स्पष्ट अजित पवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, काही ठिकाणी अपयश येते. विधानसभेला मिळालेले यश एकट्याचे नाही. हे मिळालेले यश सर्वांचे आहे. विरोधक आता काहीही आरोप करायला लागले. सैफ अली खानवर हल्ला झाला तर लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का??. घटनेचे समर्थन मी करत नाही. मात्र, चोरट्यालाही माहित नव्हते ते घर कुणाचे आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांकडे मुद्दाच राहिला नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.