विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला मेळावा मुंबईतील अंधेरीत संपन्न होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंधेरीत दाखल झाले आहेत. सभास्थळी शिवसैनिकांची गर्दी आहे. या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर ठाकरेसेनेच्या नेत्यांची भाषणं होतील. उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधी व्यासपीठावरील एका पोवाड्यानं उपस्थित शिवसैनिकांचे लक्ष वेधलं. पोवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं नाव आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शिवसैनिकांनी कान टवकारले.
Walmik Karad: सनीला गुंतवू नका, तो माझ्या..; कराडचा PIला फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच एसपींचा मोठा निर्णय
शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाचा प्रवासाचं वर्णन करणारा पोवाडा सुरु होता. त्यात एके ठिकाणी राज यांचा उल्लेख आला. विशेष म्हणजे राज यांचं नाव उद्धव यांच्यासोबतीनं घेण्यात आलं. दोघांची नावं एकत्रच घेण्यात आली. ‘युतीला सत्तेवर घेऊन आला, राज-उद्धव होते साथीला… सिंहाचा वाटा उचलला जीर हा जी…’ असे शब्द पोवाड्यात होते. ठाकरेंच्या सेनेच्या मेळाव्यात राज यांचा उल्लेख पोवाड्यात झाल्यानं उपस्थितांना आश्चर्य वाटलं.
सैफच्या हल्लेखोराविरोधात पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा; केसला वजन, तपासातून काय काय हाती?
विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पक्षाचं पानीपत झालेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे केवळ २० उमेदवार निवडून आले. पण राज यांच्या मनसेला एकही जागा मिळाली नाही. पक्षाच्या इतिहासात प्रथमच राज यांच्या मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे ठाकरे ब्रँडच संकटात सापडला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा निकालानंतर सुरु झाली. गेल्या काही दिवसांपासून ती थांबलेली आहे. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मंचावर राज-उद्धव यांच्या कौतुकाचा पोवाडा वाजल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.