IND v NZ : भारताने न्यूझीलंडला १०७ धावांचे आव्हान दिले आहे. बऱ्याच जणांना हे आव्हान माफक वाटत असून भारताचा पराभव अटळ असल्याचे म्हटले जात आहे. पण यापूर्वी भारताने १०७ धावांचेच टार्गेट देत विजय मिळवला होता.
हायलाइट्स:
- भारताने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे टार्गेट दिले आहे.
- यापूर्वी भारताने १०७ धावांचे टार्गेट देऊन विजय मिळवला होता.
- भारताने कोणाला १०७ धावांचे टार्गेट दिले होते, जाणून घ्या…
वानखेडेच्या मैदानात त्यानंतर घोंगावलं होतं ते फिरकीचे वादळ. कारण भारताला विजय मिळवून देण्यासाठी धावून आला होता तो हरभजन सिंग. हरभजनने यावेळी हेडन, कॅटीच, ग्रिलख्रिस्ट, मायकल कॅस्प्रोव्हिच आणि ग्लेन मॅग्रा यांना बाद केले होते. हरभजनने या डावाच पाच विकेट्स मिळवत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी हरभजनला चांगली साथ दिली होती ती फिरकीपटू मुरली कार्तिकने. मुरलीने या सामन्यात तीन विकेट्स मिळवल्या होत्या. अनिल कुंबळे यांनी यावेळी एक बळी मिळवला होता. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला ९३ धावांवर ऑल आऊट केले होते आणि १३ धावांनी दमदार विजय साकारला होता.
मॅच गेली असं समजू नका; भारताने १०७ टार्गेट देत जिंकला होता सामना, काय घडलं होतं जाणून घ्या…
यावेळी भारताचे कर्णधार होते ते राहुल द्रविड. यावेळी मुरली कार्तिकला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला होता. कारण मुरली कार्तिकने पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात तीन बळी मिळवले होते. त्यामुळे या सामन्यातही जर भारताने न्यूझीलंडला १०७ धावांचेच आव्हान दिले असले तरी घाबरण्याची काही गरज नाही. कारण यापूर्वी भारताने फक्त १०७ धावांचे टार्गेट देऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघाने आणि त्यांच्या चाहत्यांनी यावेळी मॅच गेली असं समजू नये, कारण अजूनही सामना भारतीय संघाला जिंकता येऊ शकतो.