Marathi actor Post : सध्या प्राजक्ता माळी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अशातच आता एका मराठी अभिनेत्याने जुन्या प्रकरणांचे पाढे वाचले आहेत.
सुरेश धस यांच्या विधानामुळे प्राजक्ताला आणि तिच्या कुटुंबियांना खूप त्रास झाला. प्राजक्ता माळीने यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली असून लवकरच ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. अभिनेत्रीला मराठी कलाकारांनी, दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी पाठिंबा दिला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लोकप्रिय निर्माते नितीन वैद्य, कुशल बद्रिके, मुग्धा गोडबोले यांसारख्या अनेक कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिलाय. अशातच आता मराठी अभिनेते किरण माने यांनीसुद्धा फेसबुकवर पोस्ट शेअर केलीये.
सुप्रसिद्ध निर्मात्यांचा प्राजक्ता माळीला पाठिंबा; म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकारणी…’
किरण माने यांची पोस्ट
अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी किरण माने यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियचं आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटो व्हायरल झाले होते…कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या…मणिपूरला भगिनींची विटंबना झाली…तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक भयानक ‘समस्त महिला वर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे…#सुमारांचा_थयथयाट’
यापूर्वी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीबद्दल धक्कादायक विधान केलं होतं. त्याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली, तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणार त्रास समजू शकता, त्यामुळे इथून पुढे कोणत्याही गोष्टीचा पुरावा असल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते.
‘प्राजक्ताबाबत विधान निंदनीय..पण सोनियाजींचे बिकिनीतले फोटो आलेले तेव्हा…’ मराठी अभिनेत्याने जुनं उकरलं
दरम्यान, किरण माने यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी ‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे .